Home लाइफस्टाइल उन्हाळ्यात काळे-पिवळे, लाल-निळे कपडे का घालू नयेत? पांढऱ्या रंगाचेच कपडेच का घालावेत

उन्हाळ्यात काळे-पिवळे, लाल-निळे कपडे का घालू नयेत? पांढऱ्या रंगाचेच कपडेच का घालावेत

black clothes in summer

Don’t Wearing black clothes in summer : उन्हाळा सुरू झाला असून घाम येऊ नये म्हणून लोकांनी हलके कपडे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या हंगामात लोक त्यांच्या पोशाखांबद्दल अधिक चिंतित असतात. कारण लोक वाढत्या तापमान आणि उष्णतेमुळे हलके कपडे घालण्यास प्राधान्य देतात. काही लोक या हंगामात फक्त सुती कपडे घालण्याला जास्त प्राधान्य देतात. कारण त्यांना इतर कापड गरम वाटते. अशा परिस्थितीत कापूस व्यतिरिक्त काही फॅब्रिक्स आहेत जे परिधान केल्यावर गरम वाटत नाही. (Don’t Wearing black clothes in summer)

याशिवाय नागरिक उष्णतेपासून वाचण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धती वापरत असतात. बाहेर जाताना आपण हलके कपडे घालतो. तसेच काळ्या आणि गडद रंगाच्या कपड्यांमध्ये (Don’t Wearing black clothes in summer) खूप गरम वाटतं असं आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे लोक उन्हाळ्यात असे कपडे घालणे टाळतात. शेवटी या रंगांचे कपडे जास्त गरम वाटण्यामागे काय कारण आहे? चला जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे  : Avoid wearing black clothes in summer

काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये जास्त उष्णता असल्यामागचे कारण म्हणजे हा रंग उष्णता शोषून घेतो. उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घातल्याने शोषली जाणारी उष्णता लवकर परावर्तित होत नाही. त्यामुळे शरीराला जास्त उष्णता जाणवते. यामुळे उन्हाळ्यात काळे कपडे घालणे लोकांना आवडत नाही.

तसेच सूर्याची किरणे काळ्या आणि गडद रंगाच्या कपड्यांवर पडतात तेव्हा ते जास्त काळ टिकून राहतात. ते लगेच तिथून हटत नाहीत. यामुळे हे कपडे जास्त काळ उबदार राहतात आणि परिधान करणाऱ्यांना जास्त गरम वाटते.

पांढरे कपडे कमी उबदार का वाटतात? : Why do white clothes feel less warm

उन्हाळ्यात लोकांना पांढऱ्या रंगाचे कपडे (Wearing White clothes in summer) घालायला आवडतात. कारण अशा कपड्यांमध्ये शोषकता कमी असते. म्हणजे या कपड्यांवर सूर्यप्रकाश जास्त काळ राहत नाही. म्हणूनच ते जास्त गरम होत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात लोक पांढऱ्या रंगाचे कपडे जास्त घालतात.

हलक्या रंगाचे कपडे घाला : Wear light colored clothes

उन्हाळ्यात सूर्यप्रकाश अधिक मजबूत असतो. त्यामुळे हलक्या रंगाचे कपडे घालावेत. कारण हलके रंग प्रकाश परावर्तित करतात. ज्यामुळे उष्णता कमी होते. याउलट थंडीत गडद रंगाचे कपडे घालावेत. गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात आणि शरीराला उबदारपणा देतात आणि त्यामुळे हिवाळ्यात थंडीपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात, कापूस, शिफॉन, जॉर्जेट, क्रेपसारखे पातळ आणि हलके कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे हवा सहजतेने जाऊ शकते.

उन्हाळ्यात हे कपडे परिधान करा वाटेल आरामदायक : Feel comfortable wearing these clothes in summer

1. लिनेन :

उन्हाळ्यात सर्वात जास्त आवडते असे कोणतेही फॅब्रिक असेल तर ते लिनेन आहे. कापसापासून बनवलेले हे फॅब्रिक खरं तर खूप हलके असते, ज्यामुळे तुमची त्वचा सतत हवेच्या संपर्कात राहते. यामुळे तुमचा घाम सतत कोरडा पडत राहतो आणि त्यामुळे उष्माघात वगैरे होत नाही. जरी या फॅब्रिकमध्ये (Don’t Wearing black clothes in summer) सुरकुत्या फार लवकर दिसतात, परंतु जर तुम्ही ते धुवून हँगरमध्ये ठेवले तर ते लगेच सूक्ते आणि त्यामध्ये सुरकुत्या नसतात. या फॅब्रिकपासून बनवलेले शर्ट, कुर्ते, सूट, साड्या आणि टी-शर्ट्स उन्हाळ्यात परिधान करणे गरजेचे आहे.

2. जॉर्जेट :

उन्हाळ्यात जॉर्जेट फॅब्रिकलाही खूप खूप पसंती मिळते. या फॅब्रिकपासून बनवलेल्या साड्या, सूट, कुर्ते, कपडे आणि शर्ट तरुणांना फार आवडतात. शिफॉनसारखे दिसणारे हे फॅब्रिक हलके वजनाचे फॅब्रिक आहे जे केवळ उन्हाळ्यात आराम देत नाही तर स्टायलिश देखील दिसते.

3.रेयॉन :

रेयॉन हे प्रत्यक्षात कापूस, रेशीम, तागाचे आणि लोकरीचे कापड यांचे मिश्रण आहे जे रेशीम म्हणून वापरले जाते, हे कापड रेशीमपेक्षा खूपच स्वस्त आहे. हे फॅब्रिक तुम्ही उन्हाळ्यात घालू शकता. त्याचे ड्रेसेस, कुर्त्या, शर्ट्स वगैरे बाजारात मोठ्या प्रमाणात असतात.

4.चेंबर :

चेंबर हे फॅब्रिक तुम्हाला उन्हाळ्यात मस्त लुक देते आणि तुम्हाला थंड ठेवते. डेनिमसारखे दिसणारे हे फॅब्रिक अतिशय हलके वजनाचे आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते जितके जास्त धुतले जाते तितके मऊ होते. या उन्हाळ्यात तुम्ही या फॅब्रिकचे शर्ट, कुर्ता, स्कर्ट आणि पॅन्ट ट्राय करू शकता. (Don’t Wearing black clothes in summer)

5.खादी :

नागरिकांना हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये खादी कपडे घालायला आवडतात. हे कपडे हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते, तर उन्हाळ्यात ते कोरडे आणि आरामदायक ठेवते. उन्हाळ्यात खादीचे कपडे घाम शोषून शरीराला थंडावा देतात. गेल्या काही वर्षांपासून फॅशन जगतात खादीचा वापर झपाट्याने होत असून आता त्याच्या कुर्त्यांव्यतिरिक्त साड्या, सूट, शर्ट, ड्रेस, पॅन्ट इत्यादीही बाजारात उपलब्ध आहेत

 6.लिनन (Wear Lennon clothing while exercising):

लोकांना सुती कापडानंतर जर कोणते फॅब्रिक जास्त आवडत असेल तर ते तागाचे आहे. लिनन एक अतिशय मऊ आणि सैलपणे विणलेले फॅब्रिक आहे. हे कापड अतिशय आरामदायक आहे. उन्हात फिरल्याने शरीरातून बाहेर पडणारा घाम हा लिनेन पूर्णपणे शोषून घेत असतो.

7. चेंब्रे डेनिम :

 चेंब्रे फॅब्रिक हे डेनिमसारखे दिसते, हे अतिशय पातळ आणि हलके फॅब्रिक आहे. हे कापड सामान्य कापसापासून बनवले जाते. ते तुमच्या शरीरातील घाम शोषून घेते. तसेच ते (Tips For Wearing clothes in summer) तुम्हाला उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे टोचत नाही. अशा परिस्थितीत डेनिमऐवजी हे कापड तुम्ही उन्हाळ्यात वापरून पाहू शकता.

8. ऑरगॅनिक कॉटन :

हलके आणि शरीराला आराम देणाऱ्या फॅब्रिकबद्दल बोललो तर कॉटनचे नाव सर्वात वर येते. हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि बहुउद्देशीय फॅब्रिक आहे. उन्हाळ्यात बहुतेक लोकांच्या वॉर्डरोबमध्ये कॉटनच्या पोशाखांचा संग्रह असतो. अनेक पारंपारिक कपडे तसेच फॅशनेबल कपडे हे ऑरगॅनिक कापसापासून बनवले जातात, त्यामुळे यावेळी तुम्हीही उन्हाळ्यात सेंद्रिय सुती कपडे घाला.

Tips For Wearing clothes in summer l उन्हाळ्यात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा  :

– अस्तरचे कपडे घालणे टाळा.
– जाड कपडे घालणे टाळा.
– जास्त मेकअप टाळा.
– कमीत कमी दागिने वापरा.
– केस स्वच्छ ठेवा. जर तुमचे केस लांब असतील तर चांगले बांधा नाहीतर घामामुळे केस कमकुवत होऊ शकतात.
– हलक्या रंगाचे कपडे वापरा.

Wear loose clothing while exercising l व्यायाम करताना सैल कपडे घालावेत! :

– जेव्हा उष्णता वाढू लागते तेव्हा मोठे कपडे घाला जेणेकरून तुम्हाला ताजे आणि आरामदायक वाटेल. म्हणून, केपलिन किंवा पॉलीप्रॉपिलीन फॅब्रिकचे कपडे घाला जे तुमच्या शरीरातील ओलावा सहज शोषून घेतात. यामुळे तुम्हाला हलके वाटेल आणि जास्त गरमही जाणवणार नाही.

– वर्कआऊट दरम्यान, असे सुती कपडे घालू नका जे घाम शोषल्यानंतर ओले राहतील आणि त्वचेच्या जवळ राहतील. प्लास्टिक किंवा रबर आधारित साहित्यापासून बनवलेले कपडे कधीही घालू नका यामुळे शरीराचे तापमान जास्त (Wear loose clothing while exercising)
 वाढते.

– उन्हाळ्यात सैल आणि आरामदायी कपडे घाला. तसेच कॅप्रिस, स्लिम-फिटिंग लॉग पँट आणि शॉर्ट्स घाला.लांब स्लीव्स असलेले टी-शर्ट घालू नका. (Wear loose clothing while exercising)

– गुडघा-लांबीचे पॉलिस्टर बॉटम योगासन किंवा सामर्थ्य प्रशिक्षणासाठी योग्य आहेत. या मटेरियलपासून बनवलेल्या वस्तू परिधान केल्याने तुम्ही 40 अंश सेल्सिअस तापमानातही थंड राहू शकाल आणि श्वासोच्छ्वासही चांगला घेऊ शकाल.

– उन्हाळ्यात मऊ आणि हलके रनिंग शूज घाला. दुखापती टाळण्यासाठी बुटाच्या आतील काठावर सपाट फोम असावा. (Wear loose clothing while exercising)