एक आर्थिक साधन म्हणून क्रेडिट कार्डांचा अनेकदा वापर केला जातो. जेव्हा क्रेडिट कार्डचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही अनेकदा लोकांचे म्हणणे ऐकले असेल की त्यापासून दूर राहावे. लोक सहसा म्हणतात की क्रेडिट कार्ड काढल्यास पैसे जास्त खर्च होतात. मात्र असे काहीही नाही. जर तुमच्याकडेही क्रेडिट कार्ड असेल तर त्याचा योग्य वापर केला त्याचे फायदे देखील आपल्याला चांगले मिळतात.
1- क्रेडिट कार्डची हिस्ट्री :
ज्यावेळी तुम्ही बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी जात असता त्यावेळी सर्वात आधी तुमची क्रेडिट हिस्ट्री तपासली जात असते. कारण ज्यावेळी तुमच्या क्रेडिट कार्डची हिस्ट्री चांगली असते त्यावेळी बँक तुम्हाला अगदी सहजच लोन देते. याशिवाय तुम्ही क्रेडिट कार्डवरून पैसे काढले असतील आणि ते तुम्ही थकवले असतील तर तुमचे क्रेडिट स्कोर वाईट असतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड काढल्यानंतर त्याचा वापर देखील योग्य करणे आवश्यक आहे.
2- क्रेडिट रिवॉर्ड पॉईंट्स :
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरात असाल तर तुम्हाला त्याचे योग्य फायदे देखील माहित असणे गरजेचे आहे. क्रेडिट कार्डमधील एक चांगला फाईल म्हणजे तुम्ही खरेदी करताना क्रेडिट कार्ड वापरलं तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. त्यामुळे तुमच्याकडील क्रेडिट कार्डने तुम्ही जेवढी जास्त खरेदी कराल तेवढे तुम्हाला जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या रिवॉर्ड पॉइंटचा फायदा तुम्हाला पुढील खरेदी करताना होतो. तसेच क्रेडिट कार्डच्या एका रिवॉर्ड पॉइंटची किंमत ही कमीत कमी 25 पैसे असते. मात्र वेगवेगळ्या बँकांसाठी ती किंमत वेगवेगळ्या असू शकते. तसेच तुम्हाला मिळालेले रिवॉर्ड पॉइंट हे रिडीम करून तुम्ही पैसे आणि शॉपिंग व्हाउचर देखील मिळवू शकता.
3- पेमेंटसाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध :
क्रेडिट कार्डचा एका चांगला फायदा म्हणजे वेगवेगळ्या क्रेडिट कार्डांवर तुम्ही पेमेंट केले तर नंतर तुम्हाला पैसे परत करण्यासाठी तब्बल 30 दिवस ते 45 दिवसांचा वेळ मिळतो. जर तुम्ही रोखीने पैसे दिले असते तर तुम्हाला लगेच पैसे भरावे लागले असते. तसेच तुम्ही जरी ऑनलाईन पैसे भरले असते तरी तुमच्या खात्यातून लगेच पैसे कापले गेले असते. त्यामुळे पैसे जमा करायला तुम्हाला 30 दिवस ते 45 दिवसांचा कालावधी मिळतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी हा एक चांगला फायदा आहे.
4- अतिरिक्त दिवसात पैसे कमवा :
जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला त्या पैशावर सुमारे तब्बल 30-45 दिवसांच्या कालावधीसाठी अतिरिक्त व्याज मिळत असते. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही शॉर्ट टर्म एफडी देखील मिळवू शकता, अन्यथा तुम्हाला बचत खात्यात देखील व्याज मिळेल, म्हणजेच तुम्हाला पैशातून पैसे मिळतील.
5- ऑनलाईन शॉपिंगला फायदा :
फ्लिपकार्ट-ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर दररोज काही ना काही विक्री सुरू असते. त्यामुळे जर तुम्ही फ्लिपकार्ट-ॲमेझॉन यांसारख्या वेबसाइटवरून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला काही प्रमाणात सूट किंवा कॅशबॅक देखील मिळतो. याशिवाय तुम्हाला ते प्रॉडक्ट मूळ किमतीपेक्षा स्वस्त मिळते. म्हणजेच तुम्ही ऑनलाईन शॉपिंगसाठी क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमचे पैसे देखील काही प्रमाणात वाचू शकतात.
6- EMI सुविधा देखील उपलब्ध असेल :
जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला शॉपिंगवर EMI ची सुविधा सहज मिळेल. तसेच तुम्हाला नो कॉस्ट EMI ची सुविधा देखील मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला EMI वर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. जरी आता तुम्हाला डेबिट कार्डवर देखील EMI मिळण्यास सुरुवात झाली आहे, परंतु डीलमध्ये, बहुतेक वेळा क्रेडिट कार्डवरच विनाशुल्क EMI ची सुविधा उपलब्ध असते.
7- अडचणीच्या काळात मदत :
तुम्हाला अचानक मोठी रक्कम भरावी लागली तरी क्रेडिट कार्ड खूप उपयुक्त ठरते. समजा तुमच्याकडे अचानक वैद्यकीय आणीबाणी आली तर तुमच्या खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने पेटीएम रिचार्ज करू शकता, ते तुमच्या खात्यात ट्रान्सफर करू शकता आणि पैसे काढू शकता. तथापि, क्रेडिट कार्डने पेटीएम रिचार्ज करण्यासाठी, तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क भरावे लागतील.
8- इन्शुरन्स :
क्रेडिट कार्ड वापरण्याचा आणखी एक सर्वात मोठा फायदा म्हणजे विमा लाभ. अनेक क्रेडिट कार्ड विविध प्रकारचे विमा फायदे आपल्या ग्राहकांना देत असतात. तसेच ते वैयक्तिक अपघात विमा, प्रवास विमा, खरेदी संरक्षण यांसह अनेक फायदे प्रदान करतात. म्हणूनचं क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी, ते तुम्हाला विमा संरक्षण देते की नाही हे देखील नक्की तपासा.
9- ईएमआयद्वारे बिल भरता येते :
ज्या गोष्टी तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे एकरकमी भरून खरेदी करू शकत नाही, त्या तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे सहज खरेदी करू शकता. त्यानंतर तुम्ही त्याची EMI मध्ये परतफेड करू शकता. मात्र EMI देखील दोन प्रकारची आहेत. नो-कॉस्ट ईएमआय 3 ते 9 महिन्यांपर्यंत आहे. तुमच्याकडून यामध्ये व्याज आकारले जात नाही. दुसरा व्याजासह ईएमआय आहे जो सामान्यतः एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी असतो. यामध्ये कमी व्याजासह EMI सुविधा उपलब्ध आहे. अशाप्रकारे, क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून, तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड प्रॉफिट कार्डमध्ये बदलू शकता.
10- खरेदी संरक्षण फीचर्स :
समजा तुम्ही जास्त किंमतीत एखादी वस्तू खरेदी केली आहे आणि तुम्हाला खराब झालेले उत्पादन मिळाले आहे. अशा परिस्थितीत जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या क्रेडिट कार्डवरील खरेदी संरक्षण वैशिष्ट्यासह, वस्तूंची दुरुस्ती किंवा बदलण्याची किंमत विशिष्ट कालावधीसाठी संरक्षित केली जाते.
11- क्रेडिट कार्ड वापरताना काय खबरदारी घ्यावी :
क्रेडिट कार्डचा वापर हुशारीने केला पाहिजे. वास्तविक, हे एक कर्ज आहे ज्याची ठराविक कालावधीत पुर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये, देय तारखेपर्यंत पूर्ण पेमेंट, किमान पेमेंट किंवा ईएमआयमध्ये बदल करण्याच्या सूचना आवश्यक आहेत. तुम्ही असे न केल्यास, बँक तुमच्याकडून जास्त व्याज आकारू शकते. यासोबतच क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्याची सुविधाही आहे पण त्यावर जास्त व्याज द्यावे लागते. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड पूर्ण जबाबदारीने वापरणे महत्त्वाचे आहे आणि कोणतीही खरेदी करण्यापूर्वी पैसे कसे दिले जातील हे ठरवणेही महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवू शकत असाल तर क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर डील बनेल.