Home Uncategorized गुगलला टक्कर देण्यासाठी Apple कंपनीचे AI क्षेत्रात पदार्पण; केलं पावरफुल AI फीचर्स...

गुगलला टक्कर देण्यासाठी Apple कंपनीचे AI क्षेत्रात पदार्पण; केलं पावरफुल AI फीचर्स लाँच

Apple कंपनीने WWDC 2024 कार्यक्रमात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. AI व्यतिरिक्त, कंपनीने नवीन ऑपरेटिंग सिस्टम देखील सादर केल्या आहेत.

Apple AI

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) हे आजच्या जगाचे वास्तव आहे. जर तुम्हाला स्पर्धेत टिकायचे असेल तर तुमची AI वर मजबूत पकड असायला हवी. जगभरातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या त्यांचे स्वतःचे AI मॉडेल विकसित करत आहेत. नुकतेच गुगलने त्याचे AI मॉडेल हे Gemini AI अपग्रेड केले आहे. AI च्या जमान्यात Apple देखील या शर्यतीत स्वत:ला मागे ठेवू शकत नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या जागतिक विकासक परिषदेत (WWDC 2024) नवीन AI वैशिष्ट्यांचे अनावरण केले आहे. ॲपलने हे सर्व ओपनएआयच्या चॅटजीपीटी मॉडेलच्या मदतीने केले आहे.

Apple कंपनीने WWDC 2024 कार्यक्रमात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. AI व्यतिरिक्त, कंपनीने नवीन ऑपरेटिंग सिस्टम देखील सादर केल्या आहेत. ज्यामध्ये iOS 18, iPadOS 18, VisionOS 2, macOS Sequoia आणि WatchOS11 यांचा समावेश आहे. टिम कुकच्या नेतृत्वाखालील ॲपलने सांगितले की, त्यांचे अनेक सॉफ्टवेअर चॅटजीपीटीशी जोडले गेले आहेत.

Apple ची AI दुनिया कशी असणार :

संपूर्ण ताकदीनिशी AI क्षेत्रात उतरलेल्या Apple ने आपल्या AI वर्ल्डला Apple Intelligence असे नाव दिले आहे. या अंतर्गत कंपनीने AI असिस्टंट Siri मध्ये मोठे बदल केले आहेत. लोकांची प्रायव्हसी लक्षात घेऊन कंपनी एआय फीचर्सचा फायदा देणार आहे. Apple Intelligence Concept कसे काम करेल ते पुढे जाणून घेऊयात…

Apple इंटेलिजन्सचे कार्य कसे करणार? :

ॲपलने ‘ऍपल इंटेलिजन्स’ या नावाने एआयच्या जगात प्रवेश केला आहे. वापरकर्त्यांची गोपनीयता लक्षात घेऊन AI वैशिष्ट्यांचे फायदे प्रदान करणे हा बुद्धिमत्तेचा उद्देश आहे. ॲपल इंटेलिजन्सबद्दल बोलताना टीम कुक म्हणाले की, आता ‘पर्सनल इंटेलिजन्स’ची गरज आहे. ॲपलसाठी हे पुढचे मोठे पाऊल आहे. Apple Intelligence प्रतिमा तयार करू शकते, वेगवेगळ्या ॲप्समध्ये काम करू शकते, तुम्ही काय म्हणता ते समजू शकते आणि जनरेटिव्ह AI च्या मदतीने दैनंदिन कामे सुलभ आणि चांगली बनवू शकतात. तसेच याद्वारे तुम्ही ईमेल आणि कंटेन्ट लिहू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही ऑडिओ अर्थात आवाजाचा मजकूरात सारांश देऊ शकता, तसेच तुमचा ऑडिओ देखील सेट करू शकता, याशिवाय तुम्ही फोटो आणि इमोजी देखील तयार करू शकता.

ॲपल इंटेलिजन्स या उपकरणांवर चालतील :

Apple Intelligence तुमच्या Apple उपकरणांवर काम करेल. याशिवाय काही कठीण कामांसाठी ते पर्सनल क्लाउड कॉम्प्युटची मदत घेईल. कंपनी म्हणते की तुमचा डेटा संग्रहित किंवा उघडला जात नाही. Apple Intelligence, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max, iPad यासह M1 किंवा नंतरच्या चिपसेटसह MacBooks वर चालेल. अमेरिकेत, हे iOS18, iPadOS 18 आणि macOS Sequoia वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल.

Siri आणि ChatGPT चे फायदे :

Apple ने आपला AI असिस्टंट Siri अपग्रेड करण्यासाठी ChatGPT जोडले आहे. नवीन अपडेटसह, Siri पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल आणि तुम्हाला चांगले कनेक्शन जाणवेल. सिरीची रचनाही बदलत आहे. सिरी सक्रिय झाल्यावर, स्क्रीनच्या काठावर एक चमकणारा प्रकाश दिसेल. याशिवाय ऑनस्क्रीन अवेअरनेससाठीही सपोर्ट मिळणार आहे. यासह, सिरी स्क्रीनवर काय चालले आहे हे समजून घेऊन कारवाई करण्यास सक्षम असेल.