Home ट्रेंडिंग बिल गेट्सने घेतला नागपूरच्या डॉली चहाचा आस्वाद! व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

बिल गेट्सने घेतला नागपूरच्या डॉली चहाचा आस्वाद! व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Bill Gates relished Nagpur's Dolly tea

Dolly Tea Chaiwala : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी काल म्हणजेच 29 फेब्रुवारीला ओडिशातील भुवनेश्वरमधील मां मंगला बस्तीला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भारत दौऱ्यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. (Bill Gates tasted Nagpur’s Dolly Tea Chaiwala)

बिल गेट्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. बिल गेट्स भारतात आले आणि त्यांनी डॉली चायवाला चहाची ऑर्डर दिली आहे. इथे त्यांनी चहाचा घोट घेताना भारताचे कौतुक केले आहे. (Bill Gates tasted Nagpur’s Dolly Tea Chaiwala)

कोण आहे डॉली चायवाला? :

डॉली चायवाला  (Bill Gates Dolly Tea Chaiwala) : त्याच्या चहा बनवण्याच्या कौशल्यासाठी ओळखली जाते. आपल्या अनोख्या पद्धतीने त्याने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली आहे. डॉली चायवाला सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय असल्याची माहिती आहे. व्हिडिओमध्ये बिल गेट्स चहा विक्रेत्याशी बोलताना दिसत आहेत, जो सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बिल गेट्स एका चहा (Bill Gates Dolly Tea Chaiwala) विक्रेत्याकडून चहा मागवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चहा विक्रेते एक खास कार्ट वापरून स्वतःच्या खास शैलीत चहा तयार करतात. व्हिडिओच्या शेवटी बिल गेट्स ग्लासमध्ये गरम चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. या क्लिपच्या शेवटी, बिल गेट्स ग्लासमधून चहा पितात आणि डॉली चायवालासोबत (Bill Gates Dolly Tea Chaiwala) फोटोसाठी पोझ देतात.

भुवनेश्वरच्या झोपडपट्ट्यांना दिली भेट : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भुवनेश्वरमधील एका झोपडपट्टीला भेट दिली आणि तेथे राहणाऱ्या लोकांशी चर्चा केली. यासोबतच त्यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह मां मंगला बस्ती येथील बिजू आदर्श कॉलनीला देखील भेट दिली आहे. बिल गेट्स यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या हिताची विचारपूस केली आणि तेथे काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या (एसएचजी) सदस्यांशी संवाद साधला.

Dolly Chaiwala : इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) ला देखील दिली भेट : तसेच गेट्स यांनी हैदराबाद येथील कंपनीच्या इंडिया डेव्हलपमेंट सेंटरला (आयडीसी) भेट दिली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) संबंधित संधींबाबत चर्चा केली. मायक्रोसॉफ्टने एका निवेदनात म्हटले आहे की गेट्स यांनी मंगळवारी IDC ला भेट दिली जिथे त्यांनी भारतातील काही प्रतिभावान अभियंत्यांना संबोधित केले. मायक्रोसॉफ्ट आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार म्हणाले की, एआयमुळे भारतात निर्माण होणाऱ्या संधींबाबत गेट्स आशावादी आहेत. हा सर्व भेटीदरम्यान बिल गेट्स यांनी भारताचे कौतुक केले आहे.

Bill Gate Tea Video l या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या :

 बिल गेट्स यांच्या भारत भेटी दरम्यान चहाचा व्हिडीओ तुफान व्हायरल  झाला आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुमारे 40 लाख लोकांनी पाहिला आहे आणि इंस्टाग्रामवर सुमारे 3 लाख लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “पण तू चहाचा घोट का घेतला नाहीस?” स्विगीच्या अकाऊंटवरही गंमतीने लिहिले की, “मग बिल किती आहे?”

Exit mobile version