जर तुमचं बँक खातं HDFC बँकेत असलं तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. होय, HDFC बँकेने या विकेंडला एक मोठी आणि महत्वाची अपडेट्स जारी केली आहे. ज्या नागरिकांचं HDFC बँकेत खाते असेल त्यांना HDFC बँकेने ईमेल व एसएमएस करून महत्वाची अपडेट दिली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, HDFC बँकेच्या मोबाइल बँकिंग सेवा या जून महिन्यात तब्बल 2 दिवस राहणार असल्याचं सांगितलं आहे.
वास्तविक, ज्या नागरिकांचं त्या बॅंकेत खातं आहे त्या नागरिकांना SMS नुसार, HDFC बँक, मोबाइल बँकिंग ॲप व याशिवाय नेटबँकिंगवरील काही व्यवहार येत्या 9 जून आणि 16 जून रोजी पूर्णपणे बंद असणार आहेत. तसेच ग्राहक बँकेची कामे 9 जून या दिवशी पहाटेच्या सुमारास 3:30 ते 6:30 वाजेपर्यंत करू शकणार नाहीत. तर येत्या 16 जून 2024 या दिवशी पहाटेच्या सुमारास 3:30 ते 7:30 या वेळेत या सेवांचा वापर करू शकणार नाहीत.
या सेवांच्या वापरावर बंदी असेल :
बँकेच्या वेबसाइटनुसार, खाते उघडणे, ठेवी, निधी हस्तांतरण (NEFT, IMPS, RTGS आणि बँक हस्तांतरण), ऑनलाइन पेमेंट यांसारखे काही व्यवहार 9 आणि 16 जून 2024 रोजी सकाळी 03:30 ते 06:30 या वेळेत उपलब्ध नसतील. . या कालावधीत HDFC बँकेचे ग्राहक UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाहीत.
यापूर्वी या कामांवर बंदी होती :
HDFC बँकेने यापूर्वी देखील म्हटले होते की, ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधरवायचा आहे आणि सिस्टम देखील अजून स्ट्रॉंग आणि अपडेट करण्याचं काम चालू असल्याने बँकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे HDFC बँकेच्या डेबिट कार्ड, प्रीपेड कार्ड आणि क्रेडिट कार्ड या सेवांमध्ये सुधारणा होणार आहे. मात्र यासाठी दोन दिवस कार्डशी संबंधित सेवा दिलेल्या वेळेत बंद राहणार आहेत.
यामुळे, अलीकडेच 4 जून रोजी सकाळी 12.30 ते 2.30 या वेळेत डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डसाठी सिस्टम अपग्रेडचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला एटीएममधून पैसे काढता आले नाहीत. याशिवाय ऑनलाइन, पीओएस आणि नेटसेफ व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे.
प्रथम, डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डसाठी सिस्टम अपग्रेड 4 जून रोजी सकाळी 12.30 ते 2.30 या वेळेत करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत. तसेच ऑनलाइन, पीओएस आणि नेटसेफ व्यवहारही करता येणार नाहीत.