इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 17 व्या हंगामाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील (BCCI) जोरदार तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव झाला असून आता सर्वांच्या नजरा तारखांकडे लागल्या आहेत. आयपीएलचा नवा हंगाम कधी आणि केव्हा आणि कुठे होणार हे बीसीसीआयने अद्याप जाहीर केलेले नाही. त्याचबरोबर महिला प्रीमियर लीगच्या (WPL) दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेले नाही.
आता 22 मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महिला प्रीमियर लीग फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होऊ शकते. या वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुकाही होणार आहेत. आयपीएलचे सामने मात्र मार्च महिन्यात असल्याने त्याचवेळी लोकसभा निवडणूक देखील आहे. मात्र या दोन्ही गोष्टींमध्ये संघर्ष होऊ नये अशी बीसीसीआयची इच्छा आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेनंतर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होईल असे संकेत बीसीसीआयने दिले होते.
यावर्षी IPL चे सामने परदेशात झाले :
2009 आणि 2014 या वर्षांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे सामने परदेशात पार पडले होते. 2009 मधील सर्व सामने दक्षिण आफ्रिकेत खेळले गेले. तर 2014 मध्ये पहिले 20 सामने UAE मध्ये झाले होते. त्यानंतर ही स्पर्धा भारतात परतली आहे.
महिला प्रीमियर लीग दोन शहरांमध्ये आयोजित केली जाऊ शकते? :
बीसीसीआयने गेल्या वर्षी महिला प्रीमियर लीगचे (BCCI) आयोजन केले होते. त्यानंतर सर्व सामने एकाच शहरात झाले. मुंबईतील वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने खेळवण्यात आले आहेत. स्पर्धा जोरदार होण्यासाठी आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी BCCI तयारी करत आहे. यावेळी महिला प्रीमियर लीग (WPL) फक्त दोन शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यामध्ये दिल्ली आणि बेंगळुरूची निवड करण्यात आली आहे. WPL मध्ये मुंबई इंडियाचा संघ पहिल्या सत्रात चॅम्पियन झाला होता. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या स्पर्धेत सहभागी होणारे इतर संघ आहेत.
मिचेल स्टार्क ठरला इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! :
अशातच IPL 2024 च्या लिलावात सर्वात महागड्या खेळाडूचा विक्रम दोनदा मोडला गेला. ऑस्ट्रेलियाचा स्टार मिचेल स्टार्क हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कारण त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
KKR आणि गुजरातमध्ये स्टार्कसाठी लढत :
स्टार मिचेल स्टार्क या दिग्गज खेळाडूसाठी प्रथम दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती. यामध्ये मिचेल स्टार्कला मुंबई इंडियन्स 7.20 कोटींची बोली लावली होती. पण दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा बोली लावली. कोलकाता नाईट रायडर्सने 9.60 कोटी रुपयांवर उडी घेतली होती. मुंबईच्या बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्स बोलीत आले होते. मात्र या दोन्ही संघांकडे सुमारे 31 कोटी रुपये होते आणि लवकरच बोली 20 कोटी रुपयांच्या पुढे जात राहिली.
त्यानंतर मिचेल स्टार्कने पॅट कमिन्सची 20.5 कोटी रुपयांचा रेकॉर्ड मोडला. मात्र 24.75 कोटी रुपये गेल्यानंतर गुजरात टायटन्सने या लिलावातून माघार घेतली. अशाप्रकारे केकेआरने मिचेल स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
भारतीय प्रीमियर लीग (IPL 2024 ) देशात निवडणुका होत असतानाच भारतातही होण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले आहे. सर्वात मोठा क्रिकेट महोत्सव 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा त्याच वेळी जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे
परंतु बीसीसीआयच्या एका सूत्रांकडून असे समजले की, आयपीएल भारतात खेळला जाईल. “तसे काही नाही, स्पर्धा देशाबाहेर हलवणे, कारण सार्वत्रिक निवडणूकही त्याच वेळी होणार आहे. जर कोणत्याही राज्याला त्या वेळी सामना आयोजित करायचा नसेल तर कोणत्याही न्याय्य कारणाने, सामना होऊ शकतो. दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले जावे,” बीसीसीआयच्या एका सूत्राने एएनआयला सांगितले आहे.
यासह आयपीएल 2024 च्या लिलावात मागील लिलावाच्या दर्शकांच्या तुलनेत 57 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी X ला जाहीर केले की IPL लिलावात एकूण 22.8 दशलक्ष दर्शक होते, जे 2022 च्या लिलावात झालेल्या लिलावापेक्षा जास्त होते. त्यामुळे BCCI आयपीएल सामन्याचे वेळापत्रक कधी जाहीर करणाऱ्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.