Home कृषी व सरकारी योजना पैसे बुडण्याची कसलीही भीती नाही, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवल्यास होतील...

पैसे बुडण्याची कसलीही भीती नाही, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवल्यास होतील दुप्पट

पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत तिथे तुम्ही गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवू शकता.

kisan vikas patra scheme

आपल्या सर्वांच्या मागे बचत न करण्यामागे काहींना काही कारणे नक्कीच असतात. जसे की पैशांची बचत करण्यासाठी सुरवातीला थोडे जास्त पैसे लागतात. त्यामुळे तुम्ही ते दुसऱ्या दिवसासाठी पुढे ढकलता. याशिवाय चांगली गुंतवणूक कुठे करायची या विचारात अनेक दिवस घालवता. सध्याच्या काळात ज्या प्रकारे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिक देखील गुंतवणुक करण्यास प्राधान्य देतात. अशा सर्व नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत तिथे तुम्ही गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवू शकता. त्यामुळे तुमच्यावर अडचणीच्या काळात जो काही भार येतो तो  काही प्रमाणात हलका होण्यास मदत होते.  

किसान विकास पत्र योजना ठरतेय फायद्याची :

या महागाईच्या युगात तुम्हीही उत्पन्न वाढवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसने कोणताही धोका न पत्करता सर्वसामान्यांचे पैसे दुप्पट करण्याची भन्नाट योजना आणली आहे. नागरिकांनी पोस्ट ऑफिसच्या  किसान विकास पत्र (KVP) योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे अवघ्या 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या माहितीनुसार, किसान विकास पत्रावर दरवर्षी 7.5 टक्के दराने वार्षिक व्याज नागरिकांना मिळत आहे. यामध्ये भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती एकाच वेळी गुंतवणूक करू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे किसान विकास पत्र (KVP) योजनेमधून गरज पडल्यास अडीच वर्षानंतर देखील पैसे काढता येतात. तसेच किसान विकास पत्र योजनेसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास गुंतवणूकदार 1800 266 6868 या ग्राहक सेवा नंबरवर संपर्क करू शकतात.

किसान विकास पत्र योजनेची पात्रता काय आहे? :

– किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करणारा नागरिक हा भारतीय असणे आवश्यक आहे.
– या योजनेत अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे अत्यंत आवश्यक आहे.
– जर या योजनेत प्रौढ व्यक्ती किंवा अल्पवयीन व्यक्तीला गुंतवणूक करायची असल्यास त्या व्यक्तीच्या वतीने  अशक्त व्यक्ती अर्ज करू शकते.
– सर्वात महत्वाचं म्हणजे किसान विकास पत्र योजनेत हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) आणि अनिवासी भारतीय (NRIs) गुंतवणूक करू शकत नाहीत.

KVP योजना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित कशी करावी ? :

जर एखाद्या व्यक्तीची किसान विकास पत्र योजना असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याचे खाते एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे कसे हस्तांतरित करता येते. याशिवाय अनेक विविध कारणांमुळे जर एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे खाते हस्तांतरित करायचे असल्यास व कोणकोणत्या प्रकरणांमध्ये पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या अधिकाऱ्याच्या संमतीने प्रमाणपत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकतात ते आज आपण जाणून घेऊयात…

१) मृत व्यक्तीपासून त्याच्या वारसापर्यंत.
२) धारकाकडून कायद्याच्या न्यायालयापर्यंत किंवा न्यायालयाने निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत.
३) एकल धारकापासून संयुक्त धारकांपर्यंतची नावे जिथे हस्तांतरणकर्ता एक आहे.
४) संयुक्त धारकांकडून संयुक्त धारकांपैकी एकापर्यंत.
५) एकल/संयुक्त धारकांकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत.

किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? :

Step1 : सर्वात प्रथम किसान विकास पत्र अर्ज व त्यासोबत फॉर्म A घेऊन त्यावर आवश्यक माहिती भरा.

Step 2 : तुम्ही योग्य माहितीसह भरलेला फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा जवळच्या बँकेत जाऊन सबमिट करा.

Step 3 : जर तुम्ही किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक ही एजंटद्वारे केली असल्यास, एजंटने फॉर्म A1 अवश्य भरावा. तुम्ही हे फॉर्म किसान विकास पत्र योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकता.

Step 4 : त्यानंतर तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कारण KYC प्रक्रिया ही अनिवार्य आहे. त्यासोबतच तुम्हाला आयडी आणि ॲड्रेस प्रूफ कॉपी यामध्ये तुम्ही पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदार आयडीकार्ड, ड्रायव्हर लायसन्स किंवा पासपोर्ट सबमिट करू शकता.

Step 5 : यानंतर तुमच्या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला हे सर्व कागदपत्र पोस्ट ऑफिसमध्ये किंवा जवळच्या बँकेमध्ये जाऊन सबमिट करावे लागतील. तसेच कॅश, स्थानिक पातळीवर अंमलात आणलेला चेक, पे ऑर्डर किंवा पोस्टमास्टरच्या नावे काढलेल्या डिमांड ड्राफ्ट द्वारे पेमेंट केले जाऊ शकते.

Step 6 : जोपर्यंत तुम्ही चेक, पे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पेमेंट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला KVP प्रमाणपत्र त्वरित मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ते सुरक्षित ठेवा.कारण तुम्हाला ते परिपक्वतेच्या वेळी जमा करावे लागेल. तसेच ते तुम्हाला ईमेलद्वारे देखील प्रमाणपत्र पाठवू शकतात.

किसान विकास पत्र ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळणारी एक फायदेशीर गुंतवणूक वाटत असेल तर लगेचच तुम्हीही गुंतवणूक करा. हे उघडणे आणि व्यवस्थापित करणे खूप सोपे आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त रक्कम तयार ठेवावी लागणार आहे आणि तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर पेमेंट करावे लागणार आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट (DOP) इंटरनेट बँकिंग वापरून किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देखील सक्षम करण्यात आली आहे.

किसान विकास पत्राची वैशिष्ट्ये आणि फायदे काय  आहेत? :

किसान विकास पत्र योजनेतून मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम? :

किसान विकास पत्र योजनेतील खाते 115 महिन्यांनंतर परिपक्व होत असले तरी, लॉक-इन कालावधी 30 महिने आहे. मात्र जर खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय योजनेच्या लवकर नगदीकरणास परवानगी नाही.

सहजता आणि परवडणारी क्षमता काय आहे? :

किसान विकास पत्र योजनेत तुम्ही 1,000, 5,000, 10,000 आणि 50,000 च्या मूल्यांमध्ये गुंतवणुक करू शकता. तसेच महत्वाची बाब म्हणजे यासाठी कमाल मर्यादा नाही.

नाव नोंदणी सुविधा करणे आवश्यक? :

पोस्ट ऑफिसमधून नामांकन फॉर्म मिळवा आणि नामनिर्देशित व्यक्तीबद्दल आवश्यक माहिती भरा. तुम्ही अल्पवयीन व्यक्तीचे नामांकन करत असल्यास, जन्मतारीख नमूद करा.

KVP प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक?:

रोखीने पेमेंट केले असल्यास, ते जागेवर KVP प्रमाणपत्र जारी करतात आणि चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा मनी ऑर्डरसाठी, तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

kvp ओळख स्लिप काय आहे?:

यामध्ये किसान विकास पत्र प्रमाणपत्र, KVP अनुक्रमांक, रक्कम, परिपक्वता तारीख आणि परिपक्वता तारखेला मिळणारी रक्कम समाविष्ट आहे.

निश्चित हमी परतावा आहे का? :

बाजारातील चढउतार असूनही तुम्हाला हमी पैसे मिळतील. ही योजना मुळात शेतकरी वर्गासाठी असल्याने त्यांना पावसाळ्याच्या दिवसांसाठी बचत करण्यास प्रोत्साहन देण्यास प्राधान्य देण्यात आले.