देशातभरातील लोकसभेचे निकाल काल हाती आले यामध्ये महाराष्ट्रातील 48 जागांवरील चित्र आता जवळपास निश्चित झाले असून मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती. 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिला असून शिंदे – फडणवीस- पवार यांच्या महायुतीला मोठा झटका दिला आहे. महायुतीला राज्यात फक्त आणि फटका 17 जागांवर समाधानी राहावे लागले असून महाविकास आघाडीला 31 जागा मिळालेल्या आहेत. (Maharashtra Lok Sabha Election Result : जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील खासदार कोण? पहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी)
जाणून घ्या संपूर्ण यादी :
- अहमदनगर मतदारसंघातून : निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट)
- अकोला मतदारसंघातून : अनुप धोत्रे (भारतीय जनता पार्टी)
- अमरावती मतदारसंघातून : बळवंत वानखेडे (काँग्रेस)
- संभाजीनगर मतदारसंघातून : संदीपान भुमरे (शिवसेना – एकनाथ शिंदे गट)
- बारामती मतदारसंघातून : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट)
- बीड मतदारसंघातून : बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट)
- भंडारा गोंदिया मतदारसंघातून : डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस)
- भिवंडी मतदारसंघातून : बाळ्या मामा म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट)
- बुलढाणा मतदारसंघातून : प्रतापराव जाधव (शिवसेना – एकनाथ शिंदे गट)
- चंद्रपूर मतदारसंघातून : प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
- धुळे मतदारसंघातून : सुभाष भामरे (भारतीय जनता पार्टी)
- दिंडोरी मतदारसंघातून : भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट)
- गडचिरोली मतदारसंघातून : डॉ. नामदेव दासाराम किरसान (काँग्रेस)
- हातकलंगणे मतदारसंघातून: धैर्यशील माने (शिवसेना – एकनाथ शिंदे गट)
- हिंगोली मतदारसंघातून : नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना – ठाकरे गट)
- जळगाव मतदारसंघातून : स्मिता वाघ (भारतीय जनता पार्टी)
- जालना मतदारसंघातून : कल्याणराव काळे (काँग्रेस)
- कल्याण मतदारसंघातून : श्रीकांत शिंदे (शिवसेना – शिंदे गट)
- कोल्हापुर मतदारसंघातून – छत्रपती शाहू महाराज (काँग्रेस पार्टी)
- लातूर मतदारसंघातून : शिवाजीराव काळगे (काँग्रेस)
- माढा मतदारसंघातून : धर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट)
- मावळ मतदारसंघातून : श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना – एकनाथ शिंदे गट)
- मुंबई नॉर्थ मतदारसंघातून : पियुष गोयल (भारतीय जनता पार्टी)
- मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघातून : वर्षा गायकवाड (काँग्रेस)
- मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघातून : संजय दिना पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
- मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघातून : रविंद्र वायकर (शिवसेना – एकनाथ शिंदे गट)
- मुंबई साऊथ मतदारसंघातून : अरविंद सावंत (शिवसेना – ठाकरे गट)
- मुंबई साऊथ सेंट्रल मतदारसंघातून : अनिल देसाई (शिवसेना – ठाकरे गट)
- नागपूर मतदारसंघातून : नितीन गडकरी (भारतीय जनता पार्टी)
- नांदेड मतदारसंघातून : वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
- नंदुरबार मतदारसंघातून – गोवाल पाडवी (काँँग्रेस)
- नाशिक मतदारसंघातून : राजाभाऊ वाजे (शिवसेना – ठाकरे गट)
- धाराशिव : ओमप्रकाश निंबाळकर (शिवसेना – ठाकरे गट)
- पालघर : हेमंत सावरा (भारतीय जनता पार्टी)
- परभणी मतदारसंघातून : संजय जाधव (शिवसेना – ठाकरे गट)
- पुणे मतदारसंघातून : मुरलीअण्णा मोहोळ (भारतीय जनता पार्टी)
- रायगड मतदारसंघातून : सुनिल तटकरे (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
- रामटेक मतदारसंघातून : श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
- रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून : नारायण राणे (भारतीय जनता पार्टी)
- रावेर मतदारसंघातून : रक्षा खडसे (भारतीय जनता पार्टी)
- सांगली मतदारसंघातून : विशाल पाटील (अपक्ष)
- सातारा मतदारसंघातून : छ. उदयनराजे भोसले (भारतीय जनता पार्टी)
- शिर्डी मतदारसंघातून : भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना – ठाकरे गट)
- शिरुर मतदारसंघातून : अमोल कोल्हे (शिवसेना – ठाकरे गट)
- सोलापूर मतदारसंघातून : प्रणिती शिंदे (काँग्रेस)
- ठाणे मतदारसंघातून : नरेश म्हस्के (शिवसेना – एकनाथ शिंदे गट)
- वर्धा मतदारसंघातून : अमर काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट)
- यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून : संजय देशमुख (शिवसेना – ठाकरे गट)