Home ट्रेंडिंग पुढील दोन दिवसात होणार मोठे बदल; सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढील दोन दिवसात होणार मोठे बदल; सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जून महिन्याच्या सुरवातीला काही नियमात बदल होणार आहेत. मात्र त्या बदलांचं परिणाम नागरिकांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे.

Rules changing from June 1

New Rule l मे महिन्याचे अगदी दोन दिवस बाकी आहेत. पुढील महिना जून आहे. जून महिना त्यांत महत्वाचा ठरणार आहे. कारण येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. कारण या लक्सभा निवडणुकीनंतर देशात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. कारण या निकालावर पुढील भवितव्य ठरणार  आहे. मात्र जून महिना सुरु होण्यापूर्वी देशातील काही नियमांत देखील बदल होतात. अशातच आता जून महिन्याच्या सुरवातीला काही नियमात बदल होणार आहेत. मात्र त्या बदलांचं परिणाम नागरिकांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनावर होत असतो.

अशातच या जून महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीपासून ते आधार कार्ड अपडेट करण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी जून महिन्यात कोणते बदल होणार आहेत हे जाणून घेणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यामुळे उद्भवणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही आगाऊ तयारी करू शकता.तर आज आपण जून महिन्यात कोणत्या नियमांत बदल होणार आहेत आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊयात…

ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियम बदलतील :

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. हे नवीन नियम 1 जूनपासून लागू होणार आहेत, ज्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कोणालाही सरकारी आरटीओमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही, तर ते अधिकृत खासगी प्रशिक्षण केंद्रात ही चाचणी देऊ शकतील. ही केंद्रे परीक्षा दिल्यानंतर परवाना पात्रता प्रमाणपत्र देऊ शकतील. तसेच, अल्पवयीन बालक वाहन चालवताना आढळल्यास, आता वाहन मालकास 25,000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. याशिवाय वाहनाची नोंदणी देखील रद्द केली जाणार आहे. अगदी अल्पवयीन मूल 25 वर्षांच्या आधी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकणार नाही हे सरकारने स्पष्ट केले आहेत. याशिवाय सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित केंद्रांना देखील याबद्दलची माहिती दिली आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ जूनपासून वाहतूक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सचे नवे नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्या व्यक्तीला मोठा दंड भरण्याचा सामना करावा लागेल. नवीन नियमांनुसार लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास 1000 ते 2000 रुपये दंडही होऊ शकतो.

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा :

– आता सरकारी RTO व्यतिरिक्त, आपण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अधिकृत खाजगी प्रशिक्षण केंद्रांवर देखील ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकता.
– अल्पवयीन बालक वाहन चालवताना आढळल्यास वाहन मालकास 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल आणि वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येईल.
– अल्पवयीन बालक 25 वर्षांच्या आधी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकणार नाही.

एलपीजी सिलिंडर आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत बदल होणार :

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नव्याने ठरवल्या जातात. महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री पेट्रोलियम कंपन्या या संदर्भातील घोषणा करतात. अशा परिस्थितीत 1 जून 2024 रोजी या महिन्याच्या दरात बदल होणे अपेक्षित आहे. यापूर्वी मे महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली होती. जूनमध्येही सिलिंडरच्या दरात बदल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. 1 जूनपासून प्रदीर्घ काळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्येही बदल होऊ शकतो. तथापि, किमती बदलतील की नाही हे 31 मे 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होईल.

तुम्ही 14 जूनपर्यंत आधार अपडेट करू शकता :

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI च्या मते, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपासून अपडेट केले नसेल तर तुम्ही 14 जूनपर्यंत ते मोफत करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया UIDAI पोर्टलवर 14 जून 2024 पर्यंत मोफत आहे. जर तुम्ही 14 जून नंतर तुमचे आधार कार्ड अपडेट केले तर तुम्हाला त्यासाठी काही शुल्क भरावे लागेल. तुम्ही घरी बसून किंवा आधार कार्ड केंद्राला भेट देऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर गेल्यास तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याचवेळी, सध्या UIDAI पोर्टलवर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

IDBI बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत संपणार :

आयडीबीआय बँकेच्या विशेष उत्सव एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत संपत आहे. IDBI बँकेने ग्राहकांसाठी 300 दिवस आणि 375 दिवसांची विशेष FD योजना सुरू केली आहे. बँक सामान्य ग्राहकांना 300 दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर 7.05 टक्के व्याजदर देत आहे. दरम्यान, या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. त्याचवेळी, बँक 375 दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर 7.10 टक्के व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देत आहे. त्याचवेळी, बँक 375 दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर 7.10 टक्के व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँक 444 दिवसांच्या विशेष उत्सव एफडी योजनेवर 7.20 टक्के व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.70 टक्के व्याजदर देत आहे. या सर्व विशेष FD योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2024 रोजी संपत आहे.

इंडियन बँकेच्या विशेष एफडी योजनेची अंतिम मुदत संपणार :

इंडियन बँकेच्या 300 आणि 400 दिवसांच्या विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 30 जून रोजी संपत आहे. या योजनेअंतर्गत, बँक सर्वसामान्य नागरिकांना 300 दिवसांच्या FD योजनेवर 7.05 टक्के व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याजदर देत आहे. त्याचवेळी अति ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 7.80 टक्के व्याजदर दिला जात आहे. 400 दिवसांच्या विशेष FD योजनेवर, बँक सामान्य नागरिकांना 7.25 टक्के व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देत आहे. त्याचबरोबर या कालावधीत अति ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याजदर दिला जात आहे.

पंजाब आणि सिंध बँकेची विशेष एफडी योजना :

पंजाब आणि सिंध बँक ग्राहकांना 222 दिवस, 333 दिवस आणि 444 दिवसांच्या विशेष एफडी योजना देखील देत आहे. बँक 222 दिवसांच्या एफडीवर 7.05 टक्के, 333 दिवसांच्या एफडीवर 7.10 टक्के आणि 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याजदर देत आहे. या योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदतही 30 जून 2024 रोजी संपत आहे.

 डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम दिनांक :

 डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडामध्ये नामांकन करण्याची अंतिम मुदत संपत आहे. बाजार नियामक SEBI ने म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यांमध्ये नामांकनासाठी 30 जून 2024 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. यापूर्वी ही मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपत होती, जी आता 30 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पॅन-आधार लिंक न केल्यास ही समस्या उदभवणार :

आयकर विभागाने नुकत्याच केलेल्या अधिसूचनेमध्ये करदात्यांना 31 मे पर्यंत त्यांचा स्थायी खाते क्रमांक (PAN) आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे 1 जूनपासून सामान्य दराच्या दुप्पट दराने टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स (टीडीएस) कपात करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Exit mobile version