Home ट्रेंडिंग दहावीनंतर उत्तम करिअर करायचंय? तर हे कोर्स करा; मिळेल लवकरात लवकर नोकरी...

दहावीनंतर उत्तम करिअर करायचंय? तर हे कोर्स करा; मिळेल लवकरात लवकर नोकरी  

नुकताच आज दहावीचा निकाल लागला आहे. अशातच आता विद्यार्थ्यांसह पालकांना आपल्या पाल्याला कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेयचा आहे असा प्रश्न पडला असेल. कारण दहावीनंतर विद्यार्थी त्यांची आवड आणि गुण लक्षात घेऊन कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेची निवड करतात.

SSC After Courses

दहावीनंतर विद्यार्थी त्यांची आवड आणि गुण लक्षात घेऊन कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेची निवड करतात. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकही पाल्याच्या करिअरबाबत गंभीर होतात आणि कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे याचा विचार करू लागतात जेणेकरून आपले भविष्यातील करिअर उज्वल होईल आणि त्यांची प्रगतीही होईल. मात्र, 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही अनेक पदविका अभ्यासक्रम करू शकतात. इयत्ता 10वी नंतरचा डिप्लोमा विद्यार्थ्यांना 12वी पूर्ण न करता महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याच्या अनेक संधी प्रदान करतो.  डिप्लोमा कोर्समध्ये त्यांच्या संबंधित क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून विद्यार्थ्याला नोकरी मिळवणे सोपे होईल.

डिप्लोमा कोर्सेसचा फायदा असा आहे की, विद्यार्थ्यांना उद्योगात सतत मागणी असलेल्या विशिष्ट प्रवाहाशी संबंधित संपूर्ण ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करता येतात. डिप्लोमा अभ्यासक्रम हे व्यावहारिक आणि कमी कालावधीचे असतात. हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कमी वेळेत इंटर्नशिप आणि नोकऱ्या शोधण्यात मदत करतात.

इंजिनिअरिंग डिप्लोमा :

डिप्लोमा इन इंजिनीअरिंग किंवा डिप्लोमा इन टेक्निकल एज्युकेशन हा व्यावहारिक आणि कौशल्याभिमुख प्रशिक्षणावर केंद्रित असलेला कार्यक्रम आहे. मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, कॉम्प्युटर, ऑटोमोबाईल असे अनेक इंजीनियरिंग डिप्लोमा तुम्ही करू शकता. या अभ्यासक्रमांचा कालावधी किमान 3 वर्षांचा आहे. विद्यार्थी या डिप्लोमामध्ये प्रवेश परीक्षेद्वारे किंवा थेट प्रवेशाद्वारे प्रवेश घेऊ शकतात. तसेच ही प्रवेश परीक्षा महाविद्यालयावर अवलंबून असते. इंजीनियरिंग डिप्लोमानंतर करिअरचे अनेक पर्याय आहेत जसे की खाजगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते. सरकारी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. विद्यार्थी उच्च शिक्षण देखील निवडू शकतात किंवा स्वयंरोजगार बनू शकतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.

डिप्लोमा इन फाइन आर्ट्स :

डिप्लोमा इन फाइन आर्ट्स हा कला आणि संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्र स्तरावरील अभ्यासक्रम आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना 10वी बोर्ड परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर संस्था हे अभ्यासक्रम देतात. डिप्लोमा इन फाइन आर्ट्स हा कला क्षेत्रातील प्रवेश स्तरावरील अभ्यासक्रम आहे. क्रिएटिविटी आणि डिझायनिंगमध्ये आवड असलेले विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. या अभ्यासक्रमाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. या डिप्लोमानंतर करिअरचे अनेक पर्याय आहेत जसे की ग्राफिक डिझायनर, आर्ट टीचर, फ्लॅश ॲनिमेटर, आर्ट लायझन ऑफिसर. तर तुम्हीही दहावीनंतर डिप्लोमा करण्यास इसच्छुक असाल तर हा एक उत्तम करियरचा पर्याय आहे.

स्टेनोग्राफी डिप्लोमा :

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्टेनोग्राफीचा डिप्लोमा कोर्स करता येतो. न्यायालये आणि अनेक सरकारी कार्यालयांमध्ये स्टेनोच्या जागा रिक्त राहतात. स्टेनोग्राफीसोबतच या अभ्यासक्रमात संगणक आणि टायपिंगशी संबंधित अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. करिअरच्या पर्यायांचा विचार करता, या विद्यार्थ्यांना सरकारी आणि खासगी क्षेत्रात स्टेनोग्राफर म्हणून नोकऱ्या मिळण्यास भरपूर वाव आहे. यामध्ये सुरुवातीचा तुम्हाला तब्बल 30 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.

डिप्लोमा इन आर्ट टीचर :

आर्ट टीचर डिप्लोमा किंवा डिप्लोमा इन आर्ट टीचिंग हा एक उत्तम कोर्स प्रोग्राम आहे. ज्यांचे वय 17+ पेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना आर्ट टीचरचा डिप्लोमा करता येतो. ज्या विद्यार्थ्यांना कला अध्यापन हा व्यवसाय म्हणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. डिप्लोमा इन आर्ट टीचिंग हा तपशीलवार रेखाटन आणि पेंटिंगचा 6 महिन्यांचा कार्यक्रम आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कला अध्यापनातील पदविकाधारक कला शिक्षक होण्यास पात्र ठरतात.

फॅशन डिझाईन मध्ये डिप्लोमा :

डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग हा फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील फास्ट ट्रॅक डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्सचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना फॅशन डिझाईनमधील क्रिएटिव्हिटी आणि नावीन्य शोधण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रत्येक महाविद्यालयाचे वेगवेगळे निकष आहेत. या कोर्सनंतर फॅशन डिझायनर, कॉस्च्युम डिझायनर, टेक्सटाइल डिझायनर आणि स्टायलिस्ट म्हणून करिअर करता येते.

डिजीटल मार्केटिंग डिप्लोमा :

सध्या नागरिकांना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायला प्रचंड आवडते. त्यामुळे व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोहळा मीडियाचा वापर करतात. त्यामुळे सध्या सोशल मीडियाला जास्त स्कोप आहे.  त्यामुळे आजकाल विद्यार्थी दहावीनंतर डिजीटल मार्केटिंग डिप्लोमा करू शकतात. यामध्ये तुम्ही SEO, पे-पर-क्लिक जाहिरात, सोशल मीडिया मार्केटिंग आणि ईमेल मार्केटिंग शिकू शकता. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 50 हजार ते 1.5 लाख रुपये खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांनो हा कोर्स केला तर त्याला चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळू शकते.

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट :

दहावीनंतर विद्यार्थी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकतात. अनेक प्रायव्हेट आणि सरकारी संस्थांमध्ये हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू आहे. हा डिप्लोमा प्रोग्राम 1 वर्ष कालावधीचा असेल. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना 50 हजार ते 2 लाखांपर्यंत रुपये खर्च येतो. मात्र हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात कोर्स केला तर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी अगदी सहज लागते. याशिवाय तुम्ही स्वतःचा देखील व्यवसाय करू शकतात.

पॅरा मेडिकल कोर्स :

जर तुम्हाला 10वी नंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्ही ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, एक्स-रे टेक्नॉलॉजी, रेडिओग्राफी आणि मेडिकल इमेजिंग, ईसीजी टेक्नॉलॉजी, डायलिसिस टेक्नॉलॉजी, यांचा अभ्यास करू शकता. तसेच विद्यार्थी तुम्ही मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी सारख्या विषयात डिप्लोमा करू शकतात. पॅरा मेडिकलमध्ये डिप्लोमा केल्यानंतर उमेदवाराला लॅब टेक्निशियन किंवा हॉस्पिटल, क्लिनिक, सार्वजनिक आरोग्य केंद्र किंवा वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये सहाय्यक म्हणून नोकरी मिळेल.

डिप्लोमा इन आर्किटेक्चर :

डिप्लोमा इन आर्किटेक्चर देखील एक कलात्मक क्षेत्र आहे. यामध्ये इमारतीचे बांधकाम, आराखडा, रचना यावर काम केले जाते. कोणताही विद्यार्थी जो अतिशय सर्जनशील आहे आणि त्याला भौतिकशास्त्र आणि गणिताचे ज्ञान आहे तो हा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर आपल्या करिअरमध्ये नवीन उड्डाण घेऊ शकतो.

बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन डिप्लोमा :

तुम्हाला कॉमर्स विषयात आवड असेल आणि तुम्हाला बिझनेस लाइनमध्ये जायचे असेल, तर तुम्ही १०वी नंतर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा करू शकता. यामध्ये तुम्हाला व्यवसाय चालवण्याच्या आयडिया  शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांना बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन डिप्लोमा हा कोर्स केल्यानंतर चांगल्या कंपनीत अगदी सहज नोकरी मिळवू शकतात. याशिवाय विद्यार्थी स्वतःचा देखील व्यवसाय अगदी सुरू करू शकता.

कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग :

तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये हार्डवेअर तज्ज्ञांची मागणीही वाढू लागली आहे. याशिवाय विद्यार्थी कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगमध्ये डिप्लोमा करून चांगली नोकरी देखील मिळवू शकता आणि तुम्ही स्वतःचा देखील व्यवसाय अगदी सुरू करू शकता.