Home ट्रेंडिंग बारावीनंतर काय करायचं? B.A, B.Com व्यतिरिक्त हे आहेत सर्वोत्तम करिअर पर्याय, मिळेल...

बारावीनंतर काय करायचं? B.A, B.Com व्यतिरिक्त हे आहेत सर्वोत्तम करिअर पर्याय, मिळेल जास्त पगाराची नोकरी

वाणिज्य शाखेतून कोणकोणते अभ्यासक्रम करता येतात यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घेताना काही गोष्टी सोप्या होऊ शकतात.

Which courses to do in 12th commerce and arts, Bachelor Of Arts

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. मात्र आता विद्यार्थ्यांसह पालकांच्या समोर आपल्या पाल्याच्या करिअरचा प्रश्न उपस्थित राहिला असेल. कारण प्रत्येक पालकांना आपल्या मुलाचे भवितव्य घडवायचे असते. त्यासाठी बारावीनंतरचे शिक्षण करिअरला कलाटणी देणारे असते. त्यामुळे पालकवर्ग आपल्या मुलाचे करिअर उत्तम व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात.

मात्र कित्येक विद्यार्थ्यांसह पालकांना बारावी नंतर नेमके काय करावे? कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा? जेणेकरून करिअर कसे यशस्वी होईल असा प्रश्न पडलेला असतो. तसेच कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतून कोणकोणत्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल याची देखील संपूर्ण माहिती नसल्याने कधीकधी आपल्या मुलाचा शिक्षणाचा मार्ग चुकतो. तसेच विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय असतात. मात्र आज आपण कला आणि वाणिज्य शाखेतून कोणकोणते अभ्यासक्रम करता येतात यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घेताना काही गोष्टी सोप्या होऊ शकतात.

12वी कला विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम; जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया आणि नोकरीच्या संधी :

बारावीनंतर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची चिंता वाटू लागली असेल तर निश्चिंत राहा. आज आपण बारावी आर्टस् च्या विद्यार्थ्यांचे चांगले करिअर करण्यासाठी असे काही कोर्सेस उपलब्ध आहेत ते जाणून घेणार आहोत.

बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachelor Of Arts) :

अनेक वर्षांपासून कला शाखेतून बारावी पूर्ण केलेल्यांची पहिली पसंती बॅचलर ऑफ आर्ट्स (BA) ही आहे. हा अभ्यासक्रम भारतातील प्रत्येक विद्यापीठात मोठ्या प्रमाणात शिकवला जातो. या कोर्समध्ये विद्यार्थी इतिहास, भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान, इतर मानविकी क्षेत्रे, संप्रेषण, मानववंशशास्त्र, भूगोल, सामाजिक विज्ञान आणि भाषाशास्त्र यासह अनेक विषयांमधून त्यांच्या अभ्यासाचे क्षेत्र निवडू शकतात आणि नंतर विशिष्ट विषयाचे प्राध्यापक होऊ शकतात.

बीए एलएलबी (BA LLB) :

अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कायद्याबरोबरच मानवतेचे विषय शिकवले जातात. जेणेकरून विद्यार्थ्यांना कायदेशीर संकल्पना तसेच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पैलूंबद्दल समज विकसित करता येईल. त्यात आंतरराष्ट्रीय कायदाही शिकवला जातो. हा कोर्स करून तुम्ही तुमचे उत्तम करिअर करू शकता.

बी एच एम (Bachelor in Hotel Management) :

BHM अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रत्येक कॉलेजचे वेगवेगळे निकष आहेत. बीएचएम पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा लागतो. काही महाविद्यालयांमध्ये बारावीत विद्यार्थ्याकडून 50 ते 60 टक्के गुणांची मागणी केली जाते. यामध्ये हॉटेलचे कामकाज आणि व्यवस्थापनाशी संबंधित सर्व गोष्टी तपशीलवार शिकवल्या जातात. BHM हा देशात एक उत्तम करिअर पर्याय म्हणून उदयास येत आहे.

बीबीए (Bachelor in Business Administration) :

तुमचे व्यवसाय आणि व्यवस्थापन कौशल्य चांगले असल्यास हा कोर्स तुमच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय ठरू शकतो. तुमच्या विशेषतेनुसार तुम्ही फायनान्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स किंवा इतर क्षेत्रात स्पेशलायझेशन घेऊ देखील शकता. यानंतर, एमबीए करून तुम्ही मोठ्या जागतिक स्तरावरील कंपन्यांमध्ये सर्वोत्तम पॅकेज देखील मिळवू शकता.

टूर आणि ट्रॅव्हल (Tour and Travel) :

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल, जसे की नवीन ठिकाणे शोधणे, तर तुम्ही पर्यटन उद्योगाचा अवलंब करू शकता. अनेक विद्यापीठे या विषयावर अभ्यासक्रम देतात. तुम्ही बीए इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बीबीए इन टूर अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, बीए ऑनर्स इन टूर अँड ट्रॅव्हल, बीए इन टुरिझम स्टडीज असे कोर्स करू शकता. यानंतर आपण इच्छित असल्यास, आपण स्थापित कंपनीमध्ये सामील होऊ शकता आणि काम करू शकता. संच तुम्ही फ्रीलान्स म्हणून काम देखील करू शकता किंवा आपली स्वतःची एजन्सी सुरू सुद्धा करू शकता.

बारावीनंतर हे टॉप-5 कोर्स करा, लाखात पगार मिळेल :

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे याबाबत संभ्रम असतो. जर वाणिज्य शाखेतून तुम्ही बारावी पूर्ण केली असेल तर तुम्ही बारावीनंतर अकाउंटिंग, जर्नालिझम, पेंटिंग आणि कॉम्प्युटर असे अनेक कोर्सेस आहेत जे करून तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता.

डिजीटल मार्केटिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Digital Marketing

तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग मध्ये डिप्लोमा केला तर त्यानंतर तुमच्यापुढे करिअरचे अनेक पर्याय असतात. हा कोर्स कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त 2 वर्ष इतका असतो. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना SCO, ॲनालिटिक्स, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, कंटेंट रायटिंग, लीड जनरेशन, ब्रँड मॅनेजमेंट यांसारखे  करिअरचे अनेक पर्याय मिळू शकतात. याशिवाय तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता.

टॅली ईआरपीमध्ये डिप्लोमा (Diploma in Tally ERP) :

बारावी नंतर शॉर्ट कोर्स करायचा असल्यास तुम्ही डिप्लोमा इन टॅली ईआरपी चा कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमात टॅली शिकवली जाते. जर तुम्हाला अकाउंट्स आवडत असतील तर तुम्ही हा कोर्स करू शकता. यानंतर तुम्ही कोणत्याही खात्यातील नोकरीसाठी अर्ज करू शकता.

मॅनेजमेंट कोर्स डिप्लोमा (Diploma in Management Course) :

तुम्हाला कोणत्याही प्रवाहातून मॅनेजमेंट करायचे असेल तर तुम्ही डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्स करू शकता. या कोर्स नंतर तुम्हाला जास्त पगाराची नोकरी देखील अगदी सहजपणे मिळू शकेल. पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळतील. या कोर्सनंतर तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्टअप देखील सुरु करू शकता. तसेच वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम कोर्स आहे.

कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बी.कॉम (B.Com in Computer Application) :

कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बी.कॉम हा एक सर्वात बेस्ट पर्याय आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्पुटर प्रोग्रामिंग संदर्भात शिकवले जाते. या अभ्यासक्रमात सॉफ्टवेअर व हार्डवेअर यासंर्भात शिक्षण दिले जाते. यामध्ये अर्थशास्त्र, वित्त, व्यवसाय कायदा आदी विषय शिकवले जातात.

डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट कोर्स (Diploma in Retail Management Course) :

आजच्या काळात या कोर्सचे अनेक फायदे आहेत. या कोर्समध्ये तुम्हाला ब्रँड, त्यांची रणनीती आणि ग्राहकांना कसे आकर्षित करावे याबद्दल शिकवले जाते. रिटेल मॅनेजमेंट कोर्समधील करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, दररोज मोठे मॉल्स, मल्टी स्टोअर्स आणि शॉपिंग सेंटर्स उघडत आहेत आणि तुम्हाला 50000 ते 1 लाख रुपयांपर्यंत कुठेही नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.

ReplyForward