Home लाइफस्टाइल Life Insurance Policy : लाईफ इन्शुरन्स घेताय? या गोष्टी लक्षात ठेवा…

Life Insurance Policy : लाईफ इन्शुरन्स घेताय? या गोष्टी लक्षात ठेवा…

Life Insurance Policy : देशात सध्याच्या घडीला डझनभर जीवन विमा कंपन्या आणि शेकडोहुन अधिक लाईफ इन्शुरन्स उत्पादने आहेत. यामुळे बहुतांश नागरिकांना नेमका कोणता लाईफ इन्शुरन्स योग्य आहे? व कोणता इन्शुरन्स अयोग्य आहे हे ठरवणे कठीण होते. प्रत्येक मनुष्याकडून नेहमीच भविष्यात आर्थिक जोखिमींपासून दूर राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक अथवा बचत योजना केल्या जातात. आणि यासाठी विविध योजना देखील बँक, सरकारकडून उपलब्ध करून दिल्या आहेत. अश्या वेळी त्यांच्याकडून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेत आर्थिक सक्षम होण्यासाठी बहुतांश जण इन्शुरन्स काढतात. तसचे प्रत्येक वेळी इन्शुरन्स काढतांना वेगवेगळे प्रकार येतात. जसे की आपण नेहमी ऐकतो असे, लाइफ इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, अथवा कार इन्शुरन्स व इत्यादींचा समावेश असतो. आणि या सर्व गोष्टी मनुष्याच्या भविष्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. परंतु असे असेल तर इन्शुरन्स काढताना अनेकवेळा मोठे फ्रॉड होण्याची शक्यता असते त्यामुळे अश्यावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण जाणून घेऊयात…

अनेकदा होते फसवणूक :
इन्शुरन्स बाबत योग्य माहिती नसल्यामुळे अनेकदा लोक चुकीचा विमा खरेदी करतात अथवा एख्याद्या एजंटवर डोळे झाकून विश्वास ठेवत त्याने सांगितलेला विमा निवडतात. मात्र, यात अनेकदा याच लोकांची मोठ्याप्रमाणात फसवणूकही होते. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी बाजाराचा थोडा अभ्यास करणे आवश्यक असते.

तुमच्या हातात असतो १५ दिवसांचा वेळ :
सामान्यतः विमाधारक लोक इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी त्याबाबत असणारे मुख्य कागदपत्रे ते वाचत नाहीत किंवा ते पुरेपूर समजून घेत नाहीत. तसेच कोणतीही पॉलिसी लागू झाल्यापासून साधारण १५ दिवसांमध्ये आपल्याला पॉलिसी रद्द करण्याचाही अधिकार असतो, हे अनेकांना माहिती नसते. तसेच या कालावधीत, पॉलिसीधारकाला विमा आपली गरजांसाठी योग्य नाही, असे वाटत असल्यास खरेदी केलेली पॉलिसी १५ दिवसांच्या आत रद्द करण्याचा पर्याय विमाधारकांना असतो.

कुटुंबाला माहिती द्या !
सर्वप्रथम विमा खरेदी केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती सर्वप्रथम तुमच्या कुटुंबीयांना द्या. जेणेकरून कोणतीही दुःखात घटना घडल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्या विम्याचा लाभ घेता येणे शक्य होते. तर पॉलिसीचे सर्व कागदपत्रे डिजिटल (मोबाईल अथवा कॉम्पुटरमध्ये) किंवा कागदोपत्री (फाईल) स्वरूपात सांभाळून ठेवा. जेणेकरून तो विमा गरजेच्या वेळी उपलब्ध होईल.

वयाची मर्यादा
इन्शुरन्स खरेदी करताना तुमच्यासाठी महत्वाचे म्हणजे, तुम्ही तुमचा अथवा कुटूंबियांची इन्शुरन्स कोणत्या वयात काढत आहात. बऱ्या पैकी सर्व कंपन्यांकडे 80-85 वर्षांपर्यंत इन्शुरन्स प्लॅन हे उपलब्ध असतात. त्यामुळे इन्शुरन्स काढतांना तो योग्य वयापर्यंतचा काढणे अगदी महत्वाचे असते.

मोहात पडू नका :
टेकनॉलॉजिमुळे आज तुमची वैयक्तिक माहिती अनेक विमा एजंट अथवा विमा कंपन्यांकडे असू शकते. तसेच या कंपन्या अथवा एजंट तुमच्या पॉलिसीमधील चुका सांगून तुम्हाला पॉलिसी बदलण्याची विनंती करु शकतात तसेच विविध प्रकारची प्रलोभने देखील देऊ शकतात. मात्र कोणताही निर्णय घेतांना अभ्यास केल्याशिवाय पॉलिसी बदलण्याच्या भानगडीत पडू नका.

विमा का आवश्यक आहे?
कोणत्याही प्रकारचा विमा खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला आपण नेमकी पॉलिसी का खरेदी करत आहात, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. याव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तिला किती रकमेचा विमा आवश्यक आहे. त्यानुसार त्याची खर्चाच्या आधारे गणना करा तो विमातुमच्या वार्षिक खर्चाच्या किमान २० पट असणे आवश्यक आहे

Exit mobile version